गोदावरी पात्रातून वाळूची तस्करी करणाऱ्या तीन टिप्परसह १५ ब्रास वाळू पाथरी पोलिसांनी जप्त केली.
पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण, मुळे, हनुमंत जक्कावाड, साहेब माने, नवनाथ लोखंडे, आडे यांच्या पथकाला पाथरी शहरात गस्त घालत असताना तीन टिप्पर संशयास्पद जाताना आढळून आले. पोलिसांनी टिप्पर थांबवले असता त्यात वाळूची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. रामपुरी, वझूर, मुदगल भागातून पोखर्णी रस्त्याने ही करणारी वाहने माजलगावकडे जात होती. या वेळी तीन टिप्पर एमएच २३ डब्ल्यू १८० (चालक दादासाहेब विश्वनाथ िशदे (कपिलधारावाडी, तालुका बीड) व मालक आबा चव्हाण), एमएच १२ एचडी ६९७ (चालक विनय मिच्छद्र पट्टेकर (बीड) व मालक मनोज सिरसाठ), तसेच एमएच २३ ६७७७ (चालक धनंजय माधव मिसाळ (कोपरमोहा, तालुका शिरूर) व माउली नाथभने (बीड) जप्त करून सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बाळासाहेब िशदे, विनय पट्टेकर व धनंजय मिसाळ या तिघांना अटक करण्यात आली.

Story img Loader