अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांची गेल्या चार वर्षांतील लोकसभेतील उपस्थिती ७ होती. लोकसभेच्या गेल्या १३ अधिवेशनात ३१९ दिवसांपैकी २४३ दिवस ते उपस्थित होते. ‘लोकसत्ता’त गेल्या १६ एप्रिलच्या अंकात ‘संजय धोत्रेंची लोकसभेत ३३ टक्के उपस्थिती’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. परंतु, खासदार धोत्रे यांच्या उपस्थितीचे प्रमाण तब्बल ७७ टक्के असून केवळ ७६ दिवस अपरिहार्य कारणांमुळे ते अनुपस्थित राहिले.
या वृत्तात लोकसभा अधिवेशनातील २३२ दिवसांचा गोषवारा देण्यात आला होता. यात लोकसभा अधिवेशनाच्या २३२ दिवसांपैकी ते ७६ दिवस उपस्थित व १५६ दिवस अनुपस्थित असल्याची माहिती प्रकाशित झाली होती. प्राप्त माहितीनुसार खासदार धोत्रे २३२ दिवसांपैकी १५६ दिवस उपस्थित होते, तर ७६ दिवस अनुपस्थित, असे हवे होते. अनवधानाने त्यांची उपस्थिती ३३ टक्के, तर अनुपस्थिती ६७ टक्के असल्याचे प्रकाशित झाले आहे, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
या वृत्तात खासदार धोत्रे यांनी विचारलेल्या इतर प्रश्नांची, तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा सकारात्मक उल्लेख आहे, तसेच खासदार संजय धोत्रे यांच्याशी वृत्त प्रकाशित करण्यापूर्वी मोबाईलवर आणि एसएमएसद्वारे संपर्क केला होता. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नव्हती. सुजाण वाचकांनी ही माहिती उपलब्ध करून दिल्यानंतर आणि खातरजमा केल्यानंतर धोत्रे यांच्या  उपस्थितीचे प्रमाण ७७ टक्के असल्याचे स्पष्ट झाले.  

Story img Loader