गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर टीका केल्याबद्दल आ. संजय पाटील यांना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांनी नोटीस बजावली असून याबाबतचा खुलासा ७ दिवसांत आला नाहीतर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठय़ावर पोहोचण्यास गृहमंत्री आर.आर.पाटील जबाबदार असल्याच आरोप आ. संजय पाटील यांनी काल पत्रकार बठकीत केला होता.  तसेच पक्षत्याग करण्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली होती.  याबाबत ७ दिवसांत खुलासा करावा, अन्यथा योग्य ती कारवाई करावी लागेल असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
दरम्यान या नोटीसबाबत लोकसत्ताशी बोलताना आ. संजय पाटील यांनी सांगितले की, अद्याप आपणास नोटीस मिळालेली नाही, मात्र योग्य त्या पातळीवर साक्षीपुराव्यांसह आपण बोलण्यास तयार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा