नवीन वर्षांतील पहिलाच सण अर्थात संक्रांतीचा, गुरुवार आणि संक्रांतीचा महरूत साधत नवी मुंबईतील नागरिकांनी अनेक नवीन कामांना शुभारंभ केला. अनेक मंदिरात सकाळपासूनच संक्रातीच्या निमित्ताने भक्तांनी गर्दी केली होती.
एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा देत आध्यात्मिक कार्यक्रमांनी देखील संक्रांतीचा गोडवा वाढवला. ईश्वर नगरमधील शंकराचे मंदिर, दिघामधील हनुमान मंदिर, ऐरोलीमधील गणेश मंदिर, दत्त मंदिर, घणसोलीमधील विठ्ठल रुखमाई मंदिर, सानपाडातील दत्त मंदिर, कोपरखरणेतील जरीमरी मंदिर त्याचबरोबर स्वामी समर्थच्या मठामध्ये देखील संक्रांतीच्या निमित्ताने भक्तांनी गर्दी केली होती. आजच्या सणाचा मर्हूत साधत अनेकांनी नवीन वाहन घेण्याचा संकल्पदेखील पूर्ण केला.
अनेक ठिकाणी आजच्या दिवसांपासून हरिनाम सप्ताहाचा जागरदेखील सुरू केला आहे. महिलांचा हळदीकुंक समारंभाला आजपासून प्रांरभ झाला. नवी मुंबईतील लोकप्रतिनिधीनी सोशल मीडियावर आणि मोबाईल एसएमएस वर शुभेच्छाचा सपाटा सुरू ठेवला आहे.
संक्रांतीचा सण भक्तीमय वातावरणात साजरा
नवीन वर्षांतील पहिलाच सण अर्थात संक्रांतीचा, गुरुवार आणि संक्रांतीचा महरूत साधत नवी मुंबईतील नागरिकांनी अनेक नवीन कामांना शुभारंभ केला.
आणखी वाचा
First published on: 16-01-2015 at 02:32 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankranti festival celebrated in religious environment