मोबाईल आणि संगणकामध्ये वेळ घालविण्यापेक्षा संस्कृत भाषेच्या अभ्यासकांनी प्रचारासोबत त्यातील शास्त्र जाणून घेण्याची गरज आहे, त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक डॉ. देवदत्त पाटील यांनी व्यक्त केले.
संस्कृत भारतीचे सेवाप्रिय डॉ. शिवराम भट्ट यांनी भारतीय परंपरागत शिक्षण पद्धतीत महत्त्वाची समजली जाणारी व्याकरण शास्त्रातील महापरीक्षा (तेनाली) नुकतीच उत्तीर्ण केली. या यशाबद्दल त्यांचा अंध विद्यालयाच्या वाडेगावकर सभागृहात शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन डॉ. देवदत्त पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्कृत भारतीचे नागपूर महानगर अध्यक्ष डॉ. मधुसूदन पेन्ना, शिरीष बेडसगावकर, संजीव लाभे, संस्कृत भाषा प्रचारक शिरीष देवपुजारी, विजयकुमार उपस्थित होते. आज संस्कृत भाषेसंदर्भात शास्त्र रक्षणाची जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे, मात्र गेल्या काही वर्षांत अध्यायानामध्ये शिथिलता आली आहे. संस्कृत भाषेचे शिक्षण घ्यायचे आहे हा विचार प्रत्येकामध्ये निर्माण होणे गरजेचे असताना आज सगळ्यांची धाव पैशाकडे आहे. जास्तीत जास्त पैसा कसा मिळविता येईल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  विवेक संपादनासाठी शास्त्र शिकण्याची आवश्यकता आहे. ज्यांचे विचार चांगले, त्यांचे वर्तन चांगले राहील. संस्कृत अभ्यासकांनी शास्त्रावर भर दिला पाहिजे, असेही पाटील म्हणाले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. शिवराम भट्ट म्हणाले, संस्कृत भाषेचे अध्ययन प्रेरणा नाही तर तो एक संस्कार आहे. संस्कृत भाषेच्या एकूण १५ परीक्षा दिल्यानंतर १६ वी परीक्षा शंकरराचार्य घेतात. शलाका आणि तेनाली या दोन परीक्षाचे महत्त्व यावेळी डॉ. भट्ट यांनी सांगितले. २००७ पासून या परीक्षेची तयार सुरू केली होती. चिकाटी आणि शिक्षणाची ओढ असली की कुठलीही गोष्ट साध्य करता येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा