‘संस्कृती कलादर्पण’तर्फे गेल्या १३ वर्षांपासून चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका तसेच वृत्तवाहिन्यांमधील विविध विभागांमध्ये पुरस्कार दिले जातात. यंदा चित्रपट विभागात ४२ चित्रपट, २२ नाटके, १३ टीव्ही मालिका आणि चार वृत्तवाहिन्यांचा सहभाग होता. नाटक विभागातील २१ पैकी ७ सवरेत्कृष्ट नाटकांची निवड करण्यात आली आहे. ‘बेचकी’, ‘एका क्षणात’, ‘प्रपोजल’, ‘दुर्गाबाई जरा जपून’, ‘मायलेकी’, ‘खळ्ळ् खटॅक’, ‘वैशाली कॉटेज’ अशी सात मराठी नाटके अंतिम फेरीसाठी निवडली गेली आहेत. या नाटकांमध्ये यंदा पुरस्कारांमध्ये कोण बाजी मारणार त्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिर येथे १३ वा संस्कृती कलादर्पण नाटय़ महोत्सव रविवार, १७ फेब्रुवारीपासून रात्री ८ वाजता सुरू होत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालक आशुतोष घोरपडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार असून त्यानंतर लगेचच भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या ‘बेचकी’ या नाटकाचा प्रयोग होईल.
सात नाटकांचा आठवडाभर महोत्सव शुक्रवापर्यंत सुरू राहणार असून त्यामध्ये दुसऱ्या दिवशी ‘एका क्षणात’, तिसऱ्या दिवशी ‘दुर्गाबाई जरा जपून’, चौथ्या दिवशी ‘प्रपोजल’ तर पाचव्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘खळ्ळ् खटॅक’ तर दुपारी ४ वाजता ‘वैशाली कॉटेज’ या नाटकांचे प्रयोग सादर होतील. सोमवार ते गुरुवार होणारे सर्व प्रयोग दुपारी ४ वाजता होणार आहेत.
वास्तविक पाच सवरेत्कृष्ट नाटकांची निवड केली जाते. परंतु, स्पर्धा चुरशीची झाल्याने यंदा सात नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आल्याची माहिती संस्कृती कलादर्पण संस्थेच्या अर्चना नेवरेकर व चंद्रशेखर सांडवे यांनी दिली.
संस्कृती कलादर्पण नाटय़महोत्सव आजपासून
‘संस्कृती कलादर्पण’तर्फे गेल्या १३ वर्षांपासून चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका तसेच वृत्तवाहिन्यांमधील विविध विभागांमध्ये पुरस्कार दिले जातात. यंदा चित्रपट विभागात ४२ चित्रपट, २२ नाटके, १३ टीव्ही मालिका आणि चार वृत्तवाहिन्यांचा सहभाग होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-02-2013 at 12:48 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanskruti kaladarpan drama festival from today