हस्तकला क्षेत्रातील कसबी कारागीरांसाठी देण्यात येणाऱ्या संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने येथील शांतीलाल भांडगे यांना दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा हे उपस्थित होते. १९६९ ते १९९१ या कालावधीत मुंबई येथील विणकर सेवा केंद्रात नोकरीला असलेल्या भांडगे यांच्या ‘असावली ब्रॉकेड’ या नक्षीकलेला १९९१ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. येवल्यात सुमारे ६५०० हातमाग विणकर आहेत.
भांडगे यांनी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने आयुष्याचे सार्थक झाले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पैठणी ही येवल्याची ओळख असली तरी ती
भारतीय संस्कृतीचीही ओळख झाली आहे. पैठणीतील नाविण्यपूर्व संशोधन, कलाकुसर आणि हस्तकलेचा प्रसार, प्रचार आणि गुणवत्ता सुधार तसेच नवीन पिढीला प्रोत्साहन या सर्व बाबींचा विचार करून हा पुरस्कार देण्यात येतो.   

Story img Loader