साधारणत: ३५० ते ४०० वर्षांंपूर्वी आपल्या जीवन संघर्षांतून शब्दधन व्यक्त करणारा कवी तुकाराम आजही समान्य माणसाचे श्रध्दास्थान आहे. अत्यंत प्रतिकूल सामाजिक, आर्थिक परिस्थितीत भोळ्या जनतेला जगण्याचे बळ तुकारामांनी दिले. मनुष्य जातीने नव्हे, तर कर्तृत्वाने श्रेष्ठ होतो. शौर्य आणि निर्भयता या बाण्याने लिहिणारे व जगणारे तुकाराम हे वर्णाने वाणी, वृत्तीने शेतकरी, कृतीने समाजसुधारक, विचारांनी तत्वचिंतक आणि प्रतिभेने अभंग रचना करणारे महाकवी होते, असे प्रतिपादन प्रा.डॉ.एस.एसम. कानडजे यांनी केले आहे.
स्थानिक प्रगती सार्वजनिक वाचनालयात साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. कानडजे होते. यावेळी साहित्यिक रवींद्र इंगळे चावरेकर, साहित्यिक रमेश इंगळे-उत्रादकर, प्रा. डॉ.अनंता सिरसाठ, प्रा.कि.वा.वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार रवींद्र इंगळे-चावरेकर यांच्या ‘ग्लोबलोपनिषद’ या कविता संग्रहाला मिळाल्याबद्दल त्यांचा कवयित्री प्रा.डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ.एस.एम.कानडजे लिखित ‘संत तुकाराम चरित्र व कार्य’ या पुस्तकाचे रमेश इंगळे-उत्रादकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे. जीवनाचा अर्थ प्रतिपादित करणारी तुकारामांची कविता माणसाला झपाटून टाकते. संत तुकारामांच्या अभंगाचे, सामाजिक पैलूंचे दर्शन प्रा. डॉ. कानडजे यांनी आपल्या पुस्तकातून घडविल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा.कि.वा.वाघ यांनी, तर संचालन डॉ.सिध्देश्वर नवलाखे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा.जी.एन.जाधव, प्रा.गोविंद गायकी, पंजाबराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
‘संत तुकाराम अभंग रचना करणारे सर्वश्रेष्ठ महाकवी’
साधारणत: ३५० ते ४०० वर्षांंपूर्वी आपल्या जीवन संघर्षांतून शब्दधन व्यक्त करणारा कवी तुकाराम आजही समान्य माणसाचे श्रध्दास्थान आहे. अत्यंत प्रतिकूल सामाजिक, आर्थिक परिस्थितीत भोळ्या जनतेला जगण्याचे बळ तुकारामांनी दिले. मनुष्य जातीने नव्हे, तर कर्तृत्वाने श्रेष्ठ होतो. शौर्य आणि निर्भयता या बाण्याने
आणखी वाचा
First published on: 18-04-2013 at 02:36 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant tukarams book maintainer is great poet dr s m kandage