तालुक्यातील गोरेगाव, वनकुटे, पळशी, ढवळपुरी येथील सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या. भाळवणी व भोंद्रे येथे मात्र या पदांसाठी आज निवडणूक झाली.गोरेगाव येथे कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांच्या नेत्रृत्वाखालील मंडळाने महिलांच्या हाती सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मतदारांनीही सात बिनविरोध तर चार ठिकाणी तांबे समर्थक महिला उमेदवारांना मोठय़ा मताधिक्क्य़ाने विजयी केले. या पाश्र्वभुमीवर आज सरपंचपदी मिराबाई नरसाळे तर उपसरपंचपदी शारदा अभयसिंह नांगरे यांची बिनविरोध निवड झाली. वनकुटे येथे सोनिया शेवंते व भास्कर शिंदे यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. पळशीत सरपंचपदी संतोष जाधव तर उपसरपंचपदी सारीका शिंदे यांची निवड झाली. ढवळपुरीत लीलाबाई घोगरे यांची सरपंचपदावर तर बबनराव पवार यांची वर्णी लागली.
भाळवणी येथे सरपंचपदासाठी बबनराव चेमटे तर उपसरपंचपदासाठी शंकर रोहकले हे प्रत्येकी नऊ मते घेउन विजयी झाले. तर भोंद्रे येथे बबन झावरे चार मते घेउन सरपंच म्हणून तर उपसरपंचपदी मारूती झावरे हे पाच मते घेऊन विजयी झाले.    

Story img Loader