करिना कपूर आणि शाहीद कपूर आता फक्त लग्न करायचे बाकी होते की ‘किस्मत कनेक्शन’मुळे शाहीदचे कनेक्शन विद्याशी जोडले गेले. विद्या आली म्हणून करीनाने शाहीदला सोडले. विद्या आणि शाहीदमध्ये काही नाते जुळतेय न जुळतेय तोपर्यत ‘कमिने’मुळे प्रियांका चोप्राचा त्याच्या आयुष्यात प्रवेश झाला. आणि ‘पिग्गी’च्या प्रेमात ‘शाशा’ ‘चॉप’ झाला. पण, इजा-बिजा-तिजा झाला तरी शाहीदचा नावीन्याचा सोस संपला नाही. मग अनुष्का, नर्गिस फाकरी अगदी जॉन अब्राहमशी फाटल्यानंतर बिपाशा बासूलाही विरंगुळ्यासाठी शाशाचाच सहवास मिळाला. या सहाहीजणींकडून मिळालेले प्रेम शाहीदला फारसे रुचले नसावे म्हणून आता तो ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ची अभिनेत्री हुमा कुरेशीच्या मागे लागला आहे.
शाहीद आणि हुमा कुरेशी लपून-छपून भेटत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गोव्यात त्या दोघांनाही एकत्र फिरताना काही नजरांनी टिपले आणि आत्तापर्यंत शांत-शांत असणारे शाहीदचे आयुष्य ढवळून निघाले. अरे! तुझे प्रेम असे कसे रे? प्रेमिकांची ही यादी किती लांबणार?, असे प्रश्न त्याला विचारले गेले आणि तो हैराण झाला. ‘कोण हुमा? ज्या मुलीला मी आत्तापर्यंत फक्त दोनदा भेटलो तिच्याशी माझे नाव जोडले जाते आहे आणि अशा प्रश्नांना मला उत्तरे द्यावी लागतात हे फार वाईट आहे’, असे शाहीदने कळवळून म्हटले आहे. त्याचा चेहरा कितीही कळवळलेला असला तरी शाहीद आणि हुमामध्ये कोहीतरी घडते आहे, ही चर्चा काही संपायला तयार नाही. याआधी शाहीदच्या मागून येऊन रणबीर कपूर आणि मग रणवीर सिंगनेही प्रेमिकांचा असाच धडाका लावला होता. त्यातल्या त्यात रणबीरची गाडी कतरिनावरच थांबली आहे. तर रणवीर सिंगची गाडी तूर्तास दीपिकावर अडकून पडली आहे. पण, त्या दोघांच्याही आधी इंडस्ट्रीत आलेल्या शाहीदला चित्रपटांमध्ये जम बसवता आला नसला तरी प्रेमिकांना पटवण्यात मात्र तो नंबर वन राहिला आहे.

Story img Loader