साहित्यभूषण अण्णा भाऊ साठे कला अकादमी व लातूर येथील संशोधन केंद्राच्या वतीने देण्यात येणारे साहित्यभूषण पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. िशदे, ‘विचार शलाका’चे संपादक डॉ. नागोराव कुंभार, मुंबई विद्यापीठातील डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रल्हाद लुलेकर, उस्मानाबादचे कवी दिलावर शेख यांना जाहीर करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम या स्वरूपातील हे पुरस्कार फेब्रुवारीत दिले जाणार असल्याचे अकादमीचे अध्यक्ष डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी कळविले आहे. पुरस्कार निवड समितीत जालन्याचे डॉ. दिलीप अर्जुने, उदगीरचे प्रा. पंडित सूर्यवंशी, लातूरचे प्रा. मारुती कलवले, उस्मानाबादचे किशोर मगर, नांदेडचे बालाजी थोटवे, पुण्याचे डॉ. माणिक सोनवणे व रत्नागिरीचे प्रा. सुरेश चौथाईवाले व डॉ. बालाजी वाघमारे यांचा समावेश होता.

Story img Loader