स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई आणि ऊर्जा युवा प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रौप्यमहोत्सवी स्वा.सावरकर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून येत्या १५ ते १७ मार्च या कालावधीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहित्यनगरी, जुना गंगापूर नाका, नाशिक येथे हे संमेलन होणार आहे.
शुक्रवार १५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आयोजित ग्रंथदिंडी आणि शोभायात्रेने या संमेलनाची सुरुवात होणार असून सायंकाळी ६ वाजता शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी लातूर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर आणि अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2013 रोजी प्रकाशित
शुक्रवारपासून नाशिकमध्ये सावरकर साहित्य संमेलन
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई आणि ऊर्जा युवा प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रौप्यमहोत्सवी स्वा.सावरकर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून येत्या १५ ते १७ मार्च या कालावधीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहित्यनगरी, जुना गंगापूर नाका, नाशिक येथे हे संमेलन होणार आहे.
First published on: 13-03-2013 at 02:08 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savarkar sahitya sammelan in nashik from friday