नाटय़कर्मींमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेली चतुरंग प्रतिष्ठानची ‘सवाई एकांकिका’स्पर्धा येत्या २५ जानेवारी रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात रात्रभर रंगणार आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१२ या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धातील प्रथम पारितोषिक विजेत्या एकांकिका या ‘सवाई’स्पर्धेत सादर होणार आहेत.
स्पर्धा समितीच्या शिफारसीनुसार अपवादात्मक म्हणून काही द्वितीय किंवा विशेष उत्कृष्ट एकांकिकांनाही स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या १२ व १३ जानेवारी रोजी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे. प्राथमिक फेरीतील परीक्षकांच्या निर्णयानुसार निवड केलेल्या सात एकांकिकांची अंतिम फेरी २५ जानेवारी रोजी रवींद्र नाटय़ मंदिर येथे रात्री ८.३० ते पहाटे ६ या वेळेत होणार आहे.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज येत्या २० डिसेंबरपासून (२८ ते ३० डिसेंबर हे दिवस वगळून) दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत चतुरंग प्रतिष्ठान, डी/ई, माहिमकर बिल्डिंग, बांगडवाडी, विठ्ठलभाई पटेल मार्ग, गिरगाव येथे मिळत आहेत. तसेच chaturang1974@gmail.com या ई-मेल वरही संबंधित संस्थेला प्रवेश अर्ज मिळू शकणार आहे. प्रमाणपत्र आणि कायमस्वरुपी सन्मानचिन्हासह प्रथम पारितोषिक रोख १५ हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक रोख १० हजार रुपये असे आहे. दोन हजार रुपयांच्या प्रेक्षक पारितोषिकासह सवाई लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, प्रकाशयोजनाकार, संगीतकार, नेपथ्यकार अशा सात जणांना प्रत्येकाला प्रशस्तीपत्र, कायम स्वरुपी सन्मानचिन्ह आणि रोख १ हजार ५०० रुपये असे पारितोषिक दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ०२२-२३८९३२८२ या क्रमांकावर चतुरंग प्रतिष्ठानच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
२५ जानेवारीला ठरणार चतुरंगची ‘सवाई’ एकांकिका!
नाटय़कर्मींमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेली चतुरंग प्रतिष्ठानची ‘सवाई एकांकिका’स्पर्धा येत्या २५ जानेवारी रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात रात्रभर रंगणार आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१२ या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धातील प्रथम पारितोषिक विजेत्या एकांकिका या ‘सवाई’स्पर्धेत सादर होणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-12-2012 at 12:05 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawai drama of chaturang will decide on 25 january