न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या जिमखाना विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय धावपटु व ‘सावरपाडा एक्सप्रेस’ नावाने ओळखली जाणारी खेळाडू कविता राऊत हिच्या उपस्थितीत दि. २ फेब्रुवारीस कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. यावेळी विविध खेळात राष्ट्रीय पातळीवर नैपुण्य दाखवणाऱ्या जिमखान्यातील २० खेळाडुंचा गौरव केला जाणार आहे. कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एस. झावरे व शारिरीक शिक्षण संचालक शरद मगर यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक विद्या प्रसारक संस्थेच्या सचिव दिपलक्ष्मी म्हसे व प्रमुख पाहुणे म्हणुन संगमनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व राष्ट्रीय धावपटू सावंत असतील. संस्थेच्या जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने दरवर्षी एका जिमखानास सवरेत्कृष्ट जिमखान्याचे पारितोषिक दिले जाते. न्यु आर्टस्च्या जिमखान्याने सलग तीन वर्षे पुरस्कार मिळवला आहे. यंदाच्या पुरस्काराचे वितरण यावेळी होईल. पुणे विद्यापीठाच्या विविध खेळांच्या संघात कॉलेजच्या खेळाडुंचा सर्वाधिक सहभाग नोंदवला आहे. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी खेळाडुंना प्राधान्य दिले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रा. धन्यकुमार हराळ व प्रा. धनंजय लाटे यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा