माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अप्रोपो गम्पशनने प्रज्ञाशोध परीक्षा घेतली असून त्यामधून ३५० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. सायन्य अँड टेक्नॉलॉजी पार्क, केंद्रशासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि अप्रोपो गम्पशनने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांची प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आली असून त्यासाठी राज्यातील १ हजार ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधून ३५० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून जानेवारी २०१३ पासून या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे.