शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या गृह परिवहन विभागाने २२ मार्च २०११च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०११ला नियम लागू करण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या वाहतुकीसंबंधी पोलीस आयुक्तांच्या बैठकीत २५ ते २८ जानेवारीपर्यंत सुरक्षित वाहतूकविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक बसची तपासणी करण्यात येणार आहे.
स्कूल बस नियमावलीतील १०नुसार शालेय बस बांधणी आणि परवाना याविषयी विविध तरतुदी करण्यात आल्या आहे. परिवहन विभाग, शालेय शिक्षण विभाग, पोलीस विभाग आदींद्वारे सर्व नियमांची परिणामकारक अंमलबजावणी केली जात असून शालेयबस चालक व पालक यांचे यासाठी समन्वय आणि सहकार्य आवश्यक आहे. २५ ते २८ जानेवारी या दरम्यान शालेय बस नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत शाळेचे मुख्याध्यापक, शालेय बस चालक-मालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  याचवेळी प्रादेशिक परिवहन कार्यलयांतर्गत वाहनांची विशेष तपासणी करण्यात येणार असून पालकांनी आपल्या पाल्यांना शालेय बस नियमांची पूर्तता करणाऱ्या वाहनातूनच प्रवास करण्याची विनंती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमांची शालेयबस धारकांनी पूर्तता ३ फेब्रुवारी २०१३ पर्यंत करू संबंधित वाहनाकरिता नियमाच्या अधीन राहून योग्य तो परवाना घेऊनच वाहनाचा वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Story img Loader