शिक्षकाच्या नियुक्तीचे आदेश
शिक्षकाच्या मागणीसाठी जिंतूर तालुक्यातील हिवरखेडा येथील विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा भरवली! विद्यार्थ्यांच्या या अनोख्या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने हिवरखेडा येथे तत्काळ एका प्राथमिक शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.
केहाळ केंद्राअंतर्गत आदिवासी भागात हिवरखेडा येथे प्राथमिक शाळा आहे. जिंतूर तालुका मानस विकास प्रकल्पाखाली आहे. अनेक आदिवासी गावांमध्ये शाळांना शिक्षक नाहीत. हिवरखेडा येथे गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. सन २०११-१२ मध्ये शाळेच्या वर्गखोल्या मंजूर झाल्या. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे शाळा खोली बांधकामास आलेला निधी परत गेला. त्यामुळे सध्या ही शाळा उघडय़ावर भरत आहे. हिवरखेडा प्राथमिक शाळेला शिक्षक उपलब्ध कुंडलिग ग्यानू कराळे व युवा फेडरेशनचे अध्यक्ष संदीप सोळंके यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला होता. जिल्हा परिषदेकडून हिवरखेडा प्राथमिक शाळेत शिक्षक देण्याबाबत गेल्या पंधरा दिवसात हालचाली न झाल्यामुळे निवेदनात इशारा दिला होता. जि. प.कडून हिवरखेडा प्राथमिक शाळेत शिक्षक देण्याबाबत गेल्या १५ दिवसांत हालचाली न झाल्यामुळे गुरुवारी विद्यार्थ्यांनी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्या दालनात ठाण मांडले. त्यानंतर जोरदार हालचाली होऊन एक शिक्षक देण्यास शिक्षक विभागाने तयारी दाखवली. जिंतूर गटविकास अधिकाऱ्यांना अतिरिक्त शिक्षकांमधून एक शिक्षक हिवरखेडा शाळेस तात्पुरत्या स्वरुपात देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले. शिक्षकाची मागणी पूर्ण झाल्यामुळे दुपारनंतर विद्यार्थ्यांंनी आंदोलन मागे घेतले.     

Story img Loader