महसूल विभागाच्या वतीने गतवर्षांत जिल्ह्य़ातील शाळांची विशेष पटपडताळणी करण्यात आली. त्यावेळी जिल्ह्य़ातील ४० प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त अनुपस्थित विद्यार्थी आढळल्याने संबंधित शाळांची उद्या (शनिवारी) विशेष पथकाद्वारे फेरपटपडताळणी होणार आहे. यात ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक अनुपस्थिती आढळून आल्यास मुख्याध्यापक व संस्था अध्यक्षांविरुद्ध गुन्हे दाखल करणार तर जि. प.च्या मुख्याध्यापकांचे वेतन रोखणार आहे.
गतवर्षांत ३, ४ व ५ ऑक्टोबरला शाळांची विशेष पटपडताळणी मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. त्यात ५० टक्के किंवा ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक सरासरी अनुपस्थिती असलेल्या शाळांचे अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शिक्षण मंत्रालयात पाठविण्यात आले. दरम्यान, संबंधित शाळांवर सरकार काय कार्यवाही करणार या बाबत शिक्षण वर्तुळात दिलेल्या आदेशावरून जि. प. शिक्षण विभागाने जिल्ह्य़ातील प्राथमिक ८ तर माध्यमिक ३२ शाळांची उद्या अचानक फेरपटपडताळणी करण्याचे विशेष नियोजन केले आहे.

Story img Loader