रस्त्याच्या कामाचे दीड कोटीचे बिल थकविल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकामच्या येथील कार्यालयातील साहित्य गुरुवारी जप्त करण्यात आले. बिल न मिळाल्यामुळे पुणे येथील अजवानी क न्स्ट्रक्शन कंपनीने न्यायालयात दाखल केलेला दिवाणी दावा मंजूर झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
तक्रारकत्रे पुणे अजवानी कन्स्ट्रक्शन यांचे वकील अॅड. एम. बी. माढेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद ते बीड रस्त्याच्या कामाचा ठेका पुणे येथील अजवानी कन्स्ट्रक्शन या कंपनीस मिळाला होता. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र २००२मध्ये मिळाले होते. काम पूर्ण झाल्यानंतरही १ कोटी ५० लाखांचे बिल कंपनीस अदा केले नाही. त्यावर कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याविरूद्ध दोन दिवाणी दावे दाखल केले होते. न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला. सरकारचे पसे देण्यास वेळोवेळी सूचना देऊनही मुदतीत पसे दिले नाहीत, तसेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचे पालन केले नाही, म्हणून गेल्या २० जानेवारीला उस्मानाबाद दिवाणी न्यायालयाने वसुली वॉरंट जारी केले. त्यानुसार तक्रारकत्रे संजय अजवानी, अॅड. माढेकर व न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बांधकामचे साहित्य जप्त केले. कार्यालयातील संगणक, िपट्रर, खुच्र्या, टेबल, कुलर आदी साहित्य जप्त करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sealed of public works office osmanabad
Show comments