जिल्ह्य़ात उद्या (रविवारी) दुसऱ्या टप्प्यात १३१ ग्रामपंचायतींचे मतदान होणार असून, २ हजार ४३६ उमेदवार रिंगणात आहेत. सव्वादोन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सव्वादोनशे मतदान केंद्रे संवेदनशील असल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव तालुक्यातील असून, ३४ पंचायतींसाठी ६३३ उमेदवार रिंगणात आहेत. बीड मतदारसंघातील ७ ग्रामपंचायतींसाठी १९२, शिरूर तालुक्यातील २० ग्रामपंचायतींसाठी ३७७, पाटोदा तालुक्यात १६ ग्रामपंचायतींसाठी ३०७, केजमध्ये २३ ग्रामपंचायतींसाठी ३९२, गेवराईत २६ ग्रामपंचायतींसाठी ४४५, वडवणीत ४ ग्रामपंचायतींत ५७ व परळीत एका ग्रामपंचायतीसाठी ३३ उमेदवार मैदानात आहेत. जिल्ह्य़ातील ११५ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.
बीडच्या १३१ ग्रामपंचायतींत आज दुसऱ्या टप्प्याचे मतदान
जिल्ह्य़ात उद्या (रविवारी) दुसऱ्या टप्प्यात १३१ ग्रामपंचायतींचे मतदान होणार असून, २ हजार ४३६ उमेदवार रिंगणात आहेत. सव्वादोन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सव्वादोनशे मतदान केंद्रे संवेदनशील असल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
First published on: 23-12-2012 at 03:38 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second stage voting for 131 grampanchyat in beed