कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडून गत हंगामात गाळप झालेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन ३०० रुपयांप्रमाणे जाहीर झालेल्या बिलाची रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कृष्णा सारख कारखान्याचे सन २०११-१२ या गळीत हंगामात १० लाख २० हजार १३४ मेट्रीक टन उसाचे गळीत केले. पहिला हप्ता प्रति टन २०५० रुपये सभासद व बिगर सभासदांना दिला आहे. दिवाळी सणासाठीचा दुसरा हप्ता प्रतिटनास ३०० रुपयांप्रमाणे देण्याचा निर्णय संचालक मंडळांच्या बठकीत झाला. त्यानुसार होणारी रक्कम सातारा व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ऊस पुरवठादार सभासद व बिगर सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. नोंदणीप्रमाणे ऊस तोडणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सन २०१२ – १३ चा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असून, चालू गळीत हंगामात १० लाख मेट्रीक टनाहून अधिक उसाचे गाळप करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. दिवाळीनिमित्त सभासदांना पुढील दोन महिन्यांची साखर देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे अविनाश मोहिते यांनी पत्रकात नमूद केले आहे.     

Story img Loader