गुरुवारपासून (दि. १३) होणा-या राज्य सरकारी कर्मचा-यांच्या राज्यव्यापी संपात माध्यमिक शिक्षकही सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील गाडगे यांनी दिली. माध्यमिक शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात संघटनेचे राज्य अध्यक्ष आ. कपिल पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले आहे. त्यात जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, आश्रमशाळा प्रतिनिधी सुधीर शेंडगे, संदीप घोगरे आदी सहभागी झाले आहेत.
राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतन अनुदान मिळावे, आरटीई कायद्यामुळे कला व क्रीडाशिक्षकांवर होणारा अन्याय दूर करावा, शैक्षणिक संस्थांना वेतनेतर अनुदान मिळावे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, पटपडताळणीमुळे अतिरिक्त ठरणा-या शिक्षकांना सामावून घ्यावे, पालिका व महापालिकांच्या शाळांतील शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळावी आदी मागण्या आहेत. जिल्हय़ातील माध्यमिक शिक्षकांनी संपात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे यांनी केले आहे.
माध्यमिक शिक्षक संपात उतरणार
गुरुवारपासून (दि. १३) होणा-या राज्य सरकारी कर्मचा-यांच्या राज्यव्यापी संपात माध्यमिक शिक्षकही सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील गाडगे यांनी दिली.
First published on: 11-02-2014 at 03:08 IST
TOPICSसहभाग
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Secondary teacher will participate in strike