नाशिक विभागातील काँग्रेस कार्यकर्ते व जनसेवकांचा विभागीय मेळावा गुरुवारी (दि. २९) दुपारी १ वाजता नंदूरबार येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पक्षाच्या केंद्र-राज्य योजना समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायक देशमुख यांनी दिली. या मेळाव्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास नगर जिल्ह्य़ातील कार्यकर्ते व जनसेवकांनी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यासाठी उद्या (शुक्रवारी) दुपारी ३ वाजता नगरमधील लालटाकी भागातील विकासवर्धिनीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण व शहराध्यक्ष प्रशांत गर्जे यांनी सांगितले.
प्रदेश समितीच्या वतीने एफडीआयच्या समर्थनार्थ ४ नोव्हेंबरला दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना २१ लाख सह्य़ांचे निवेदन दिले होते. त्यावेळी ठाकरे यांनी पक्षश्रेष्ठींशी केलेल्या चर्चेनुसार राज्यात विभागीय मेळावे घेण्याचा निर्णय झाला होता. नंदूरबारच्या विभागीय मेळाव्यास नगरमधील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्य़ातील पक्षाचे मंत्री उपस्थित राहतील.

Story img Loader