कोरेगाव पार्क येथील चंद्रमा बंगल्याच्या परिसरातील चंदनाची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरटय़ांनी येथील सुरक्षारक्षकावर हल्ला केला. त्यामुळे सुरक्षारक्षकाने आपल्याकडील परवानाधारक रिव्हॉल्वरमधून हवेत तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे चंदनचोर चोरी न करताच पळून गेले.
महेंद्रसिंग दिग्विजयसिंग मुकने (वय ५०, रा. चंद्रमा बंगला, कोरेगाव पार्क) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमा बंगल्याच्या बाजूला बुधवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास चार व्यक्ती आल्या. या ठिकाणी असलेली चंदनाची चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना या बंगल्याचे सुरक्षारक्षक विजयसिंग चौहार यांना समजले. त्यामुळे चोरटय़ांनी त्यांच्यावर दगफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चौहार यांनी आपल्या परवानाधारक रिव्हॅल्वरमधून तीन गोळ्या हवेत झाडल्या. त्यामुळे चोरटे पळून गेले. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सहायक पोलीस निरीक्षक व्ही. के. जाचक हे अधिक तपास करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा