कुख्यात गुंड सल्या चेप्यावर गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या व आरोपींनी कराड व वाळवा तालुक्याच्या हद्दीतील किल्ले मच्छिंद्रगड डोंगरावर लपवून ठेवलेल्या  दोन रिव्हॉल्व्हर शहर पोलिसांनी जप्त केले आहेत. येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात ३० ऑगस्ट रोजी कुख्यात गुंड सल्या चेप्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत सहा जणांना अटक केली असून, तीन संशयित आरोपी अद्याप फरारी आहेत.
ल्ला करून पळून गेल्यानंतर आरोपींनी किल्ले मच्छिंद्रगड डोंगरावरील खंडोबा मंदिराजवळ एक, तर दुसरे रिव्हॉल्व्हर लक्ष्मी मंदिराजवळ लपवली होती. पोलिसांनी त्या हस्तगत केल्या. या रिव्हॉल्व्हर भारतीय बनावटीच्या असून, ७.६५ एमएम क्षमतेच्या आहेत.
हल्लेखोरांनी दोन रिव्हॉल्हरमधून सलीमवर बेछूट गोळीबार केल्याने तो गंभीर जखमी  असून, सध्या मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. याप्रकरणी आतापर्यंत भानुदास लक्ष्मण धोत्रे (वय ३३, रा. शनिवार पेठ, कराड), अनिल शंकर चौगुले (वय ३२, रा. शिवाजी स्टेडियमजवळ, कराड), जयवंत सर्जेराव साळवे (वय २९, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड), किरण गुलाब गावित (वय २३, अण्णा नांगरेनगर, विद्यानगर-सैदापूर), अमोल संपत मदने (वय २५, रा. सैनिक कॉलनी, बनवडी), मंदार कृष्णदेव कदम (वय २५, रा. करवडी, ता. कराड) या सहाजणांना अटक करण्यात आली आहे. हल्लेखोरांकडून दोन रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा तपास कराड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. पाटील हे करीत आहेत.  

Story img Loader