तालुक्यातील खडकवाडी येथील ‘क्लस्टर इन’ या हॉटेलवर पारनेर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ७१ हजार ४२५ रुपयांचा देशी-विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला. गेल्या काही वर्षांत स्थानिक पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
खडकवाडी येथील हॉटेल ‘क्लस्टर इन’ या हॉटेलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीर दारूविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या हॉटेलवर पाळत होती. रविवारी या हॉटेलचा मालक शरद भाऊसाहेब ढोकले (वय २७, रा.  खडकवाडी) याने नगरच्या तलरेजा वाइन शॉप येथून दारूचा मोठा साठा आणल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आबा ढोले, पोलीस नाईक ए. के. क्षीरसागर, महेश भवर, ए. के. लोटके तसेच लबडे यांच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकला.
पोलिसांनी हॉटेलची झडती घेतली असता काही देशी-विदेशी दारू सापडली. सहायक निरीक्षक मारुती मुळूक यांनी कसून चौकशी केली असता दारूचा आणखी साठा हॉटेलपासून एक किलोमीटरवर असलेल्या खडकवाडी येथील खोलीत असल्याची माहिती पुढे आली. हॉटेलवरील कारवाईनंतर हे पथक गावातील गोदामाकडे गेले. तेथील सर्व दारू जप्त करून हॉटेलचालक शरद ढोकले यास अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा