महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला गुरुवारी इचलकरंजीतील व्यंकोबा मैदानात प्रारंभ झाला. ही निवड चाचणी स्पर्धा ८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ५६ वे अधिवेशन गोंदिया येथे होणार आहे. या स्पर्धेची निवडचाचणी इचलकरंजी येथे होत असून यातून जिल्हा संघाची निवड करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी शहर राष्ट्रीय तालीम संघ तसेच प्रकाश आवाडे क्रीडा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचा शुभारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, महापौर केसरी अमृता भोसले, रायाप्पा कित्तुरे, राहुल आवाडे, रणजित जाधव उपस्थित होते.
निवड चाचणी स्पर्धेसाठी ३२० मल्लांनी सहभाग नोंदविला आहे. मनोज चव्हाण व कपिल सणगर यांच्यातील लढतीने स्पर्धेला सुरुवात झाली. मनोजने गुणावर विजय प्राप्त केला.
 

Story img Loader