जळगाव महापालिकेतील ७५ सदस्यांपैकी पाच स्वीकृत तसेच स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे.
स्वीकृत सदस्यांमध्ये सत्ताधारी खान्देश विकास आघाडीकडून माजी उपमहापौर करीम सालार व कैलास सोनवणे, मनसेकडून अनंत जोशी, भाजपचे अ‍ॅड. संजय राणे, राष्ट्रवादीच्या लता मोरे यांचा समावेश आहे. या पाचही नावांना आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. महापौर राखी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत भाजपचे सभागृह नेते डॉ. अश्विन सोनवणे यांच्या सूचनेवरून विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहातील अनुभवी सदस्य वामन खडके यांची निवड जाहीर करण्यात आली. स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये खान्देश विकास आघाडीकडून रमेश जैन, नितीन लढ्ढा, चेतन शिरसाळे, अजय पाटील, सदाशिव ढेकळे, सुदेश भोईटे, भाजपकडून रवींद्र पाटील, महानगर विकास आघाडीचे नरेंद्र पाटील व सुनील माळी, मनसेकडून मिलिंद सपकाळे, संतोष पाटील, मीना पवार, राष्ट्रवादीचे रवींद्र मोरे व अश्विनी देशमुख, जनक्रांती आघाडीचे इक्बालउद्दीन पिरजादे यांचा समावेश आहे.
महिला व बालकल्याण समितीमध्ये खान्देश विकासच्या शीतल चौधरी, ज्योती इंगळे, ममता कोल्हे, ज्योती तायडे, भाजपच्या ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, मनसेच्या मंगला चौधरी, पद्माबाई सोनवणे आणि राष्ट्रवादीच्या प्रतिभा कापसे यांचा समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा