वेश्या व्यवसायासाठी कर्नाटकातील अल्पवयीन मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने शुक्रवारी उघडकीस आणला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
मिरजेच्या पद्मा लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेशनचे पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, महिला फौजदार श्रीमती माने, विकास भोसले, साईनाथ ठाकूर आदीच्या पथकाने छापा टाकून मुलीसह तिघांना ताब्यात घेतले. अशोक रायाप्पा सांगनूर (रा. मुटकेरी, चन्नम्मा िलगाप्पा टोपोजी जि. हावेरी) आणि संजय लांडे (रा. मौजे डिग्रज) या तिघांना पोलिसांनी अटक केली. कर्नाटकातून १५ वर्षांच्या मुलीला विक्रीसाठी आणून गेले तीन दिवस लॉजमध्ये ठेवण्यात आले होते. या संदर्भात महिला शिपाई वंदना कांबळे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अल्पवयीन मुलीची विक्री; सांगलीत तिघांना अटक
वेश्या व्यवसायासाठी कर्नाटकातील अल्पवयीन मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने शुक्रवारी उघडकीस आणला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
First published on: 06-07-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sell of underage girls three arrest in sangli