येथील पीपल्स को-ऑप. बँक, तसेच मराठवाडा अर्बन बँक्स् असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि. ८) चर्चासत्राचे आयोजन केले असून रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्यकारी संचालक एस. करुपास्वामी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नागरी सहकारी बँकांच्या नव्या नियमांसंदर्भात तज्ज्ञ मंडळी चर्चासत्रात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पीपल्स बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा यांनी दिली.
बँकेचे उपाध्यक्ष रुपचंद बज, संचालक शशिकांत दोडल, बँकेचे अधिकारी संजय राजेश्वर आदी उपस्थित होते. देवडा म्हणाले की, बँकेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश देवडा यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
पीपल्स बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होईल.
बँकेत एबीपी, आरटीजीएस व एटीएमसह एकूण पाच सुविधा सुरू होणार असल्याची माहिती देवडा यांनी दिली.