मराठी भाषादिनानिमित्त ‘पार्ले पंचम संस्थे’तर्फे येत्या रविवार २४ फेब्रुवारी रोजी ‘मुंबईत घसरणारा मराठी टक्का’ या विषयावर गोलमेज परिषद होणार आहे.
पार्ले टिळक विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या सभागृहात सकाळच्या सत्रात होणाऱ्या ‘जागर मराठीचा’मध्ये शालेय मुलांचे विविध कार्यक्रम होतील. नंतर दुपारी चार ते सहा या कालावधीत ‘मुंबईत घसरणारा मराठी टक्का’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.
यामध्ये आमदार दिवाकर रावते, आमदार नितीन सरदेसाई, दीपक पवार, अजित सावंत, अ‍ॅड. किशोर जावळे हे सहभागी होतील.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार निशांत सरवणकर आणि नितीन चव्हाण करणार आहेत.

Story img Loader