अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सभापती मनमोहनसिंह चव्हाण यांनी कांॅग्रेस नेत्यांच्या जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर लावलेली हजेरी म्हणजे शिवसेनेने त्यांच्याविरुध्द दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाचा फज्जा उडणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेत कांॅग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजप, सेना व अपक्षांशी युती करून सत्ता मिळविली आहे. सेनेच्या मनमोहनसिंग चव्हाण आणि प्रभाकर उईके या दोन सदस्यांना अनुक्रमे शिक्षण व आरोग्य, तसेच समाजकल्याण सभापतीपद बहाल केले. या सभापतींचा एक वर्षांचा कार्यकाल संपल्यांनतर त्यांनी राजीनामे देऊन इतरांना संधी द्यावी, हा सेनानेत्यांचा आदेश या दोघांनीही धुडकावून लावला. राजीनामा देणार नाही, अशी दोन्ही सभापतींनी भूमिका घेतल्यामुळे सेनेच्या कार्यकत्यार्ंनी या दोघांनाही हिवरासंगम या गावाजवळ त्यांच्या शासकीय गाडय़ा अडवून सेनास्टाईलने धडा शिकवला. पण, दोन्ही सभापती राजीनामा द्यायला तयार नसल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेनेने दोघांच्याही विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर ३१ जुलला चर्चा होऊन मतदान होणार आहे. ६२ सदस्यीय जिल्हा परिषदेत कॉंग्रेस २३, राष्ट्रवादी २१, सेना १२, भाजप ४, मनसे १ आणि अपक्ष १, असे संख्याबळ आहे. अविश्वास प्रस्ताव ३३ सदस्यांच्या स्वाक्षरीने दाखल झाला आहे आणि प्रस्ताव पारीत होण्यासाठी ४२ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. याचाच अर्थ, सेनेला प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी ९ सदस्यांच्या पािठब्याची आणखी गरज आहे. असा पािठबा मिळणार नाही, याची तजवीज चव्हाण आणि उईके या सेनेच्या दोन्ही सभापतींनी चालवली आहे. त्यासाठी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, जिल्हा कांॅग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार, सरचिटणीस अशोक बोबडे इत्यादी नेत्यांना साकडे घालण्यातही दोन्ही सभापतींनी यश मिळविले आहे.
कांॅग्रेसच्या २३ सदस्यांनी प्रस्तावाला विरोध केला, तर दोन्ही सभापती बालंबाल बचावतील आणि सेनेच्या प्रस्तावाचा फज्जा उडेल, हे लक्षात घेऊन कांॅग्रेसनेही प्रस्तावाला विरोध करण्याचेच ठरविल्याचे वृत्त आहे. उल्लेखनीय म्हणजे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती देवानंद पवार यांनी घाटंजी येथे मंगळवारी आयोजित केलेल्या वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षांच्या कार्यक्रमात सेनेचे जिल्हा परिषदेचे सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत छापले होते आणि ते चव्हाण यांनी व्यासपीठावर शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, ययाती नाईक, प्रताप राठोड, शंकर बडे, अनिल आडे, देवानंद पवार  या कामॅग्रेसच्या बडय़ा नेत्यांच्या उपस्थितीत हजर राहून सेनेला जबर धक्का दिला. सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांच्या उपस्थितीचा अन्वयार्थ हाच आहे की, त्यांच्याविरुध्द सेनेनेच दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाचे कॉंग्रेस समर्थन करणार नाही आणि त्यामुळे मनमोहनसिंह चव्हाण आणि प्रभाकर उईके या दोघांनाही ‘जीवदान’ मिळून सेनेच्या प्रस्तावाचा फज्जा उडणार असल्याची चर्चा आहे. मनमोहनसिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, आपण आशावादी असून सेनेत येण्यापूर्वी कांॅग्रेसमध्येच होतो. स्वगृही आश्रय मिळेल आणि अविश्वास प्रस्ताव फेटाळला जाईल, असा विश्वास वाटतो. कांॅग्रेस नेत्यांच्या मते, शिवसेना आमचा विरोधी पक्ष आहे. त्या पक्षाच्या प्रस्तावाला समर्थन करण्याचा प्रश्नच कुठे येतो? एकंदरीत जिल्हा परिषदेच्या आपल्याच दोन्ही सभापतींविरुध्द शिवसेनेने दाखल केलेल्या प्रस्तावाला मंजूर करून घेणे शिवेसेनेसाठी सध्यातरी जीवाचे रान करण्यासारखे चित्र आहे.
बाजूला की सोबत?
घाटंजी येथे मंगळवारी आयोजित भव्य कार्यक्रमात सभापती मनमोहनसिंग चव्हाण हे कांॅग्रेस नेते शिवाजीराव मोघे आणि प्रा.वसंत पुरके यांच्या अगदी बाजूला बसून होते. ही बाब प्रा. पुरके यांच्या लक्षात एका नेत्याने आणून दिली तेव्हा प्रा.पुरके आपल्या नेहमीच्या विनोदी आणि मार्मिक शब्दात उलट प्रश्न करून म्हणाले, सभापती मनमोहनसिंग चव्हाण ‘बाजूला’ आहेत की, सोबत आहेत? मनमोहनसिंग लगेच म्हणाले आता ‘सोबत’ च