आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अधिक उत्तम सुविधा पुरविण्याकरिता व यामधून नागरी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानामध्ये नवी मुंबई महापालिका सहभागी होत आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई शहर ‘स्मार्ट सिटी’ करण्याकरिता नागरिकांना सेवा-सुविधांबाबच्या सूचना २२ जुलपर्यंत महापालिका आयुक्त यांच्या नावे लेखी स्वरूपात महापालिका मुख्यालय, सेक्टर १५, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४ या पत्त्यावर पाठवाव्यात किंवा सूचना smartcity@nmmconline.com या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

Story img Loader