तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरास बळी पडणाऱ्यांच्या जागृतीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी आपला वेळ खर्ची घालावा, असे आवाहन हिलिंग फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष प्रा. डॉ. शैलजा देवगावकर यांनी केले. हिंगणा येथील ज्येष्ठ मंडळातर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. स्तनाच्या व गर्भाशयाच्या कर्करोगावर त्यांनी उपस्थित महिलांना  मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी डॉ. एस.जी. देवगावकर यांनी ‘पर्यावरणाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व त्यादृष्टीने साठीनंतर ज्येष्ठांनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर, तर राष्ट्रीय नकलाकार राजाभाऊ चिटणीस यांनी ‘घरातील कचरा व सांडपाण्याची विल्हेवाट’ याकडे समाजाचे कसे दुर्लक्ष होते व त्यामुळे कोणते आजार होऊ शकतात, यावर विनोदी शैलीत टीकास्त्र सोडले. मंडळाचे सहसचिव वसंत उगले यांनी ‘जनतेचे आरोग्याकडे दुर्लक्ष’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सचिव गोविंदराव बुधे, प्रास्ताविक अध्यक्ष लीलाधर बेंद्रे, तर आभार वासुदेवराव मुरकुटे यांनी मानले.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती