तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरास बळी पडणाऱ्यांच्या जागृतीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी आपला वेळ खर्ची घालावा, असे आवाहन हिलिंग फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष प्रा. डॉ. शैलजा देवगावकर यांनी केले. हिंगणा येथील ज्येष्ठ मंडळातर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. स्तनाच्या व गर्भाशयाच्या कर्करोगावर त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी डॉ. एस.जी. देवगावकर यांनी ‘पर्यावरणाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व त्यादृष्टीने साठीनंतर ज्येष्ठांनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर, तर राष्ट्रीय नकलाकार राजाभाऊ चिटणीस यांनी ‘घरातील कचरा व सांडपाण्याची विल्हेवाट’ याकडे समाजाचे कसे दुर्लक्ष होते व त्यामुळे कोणते आजार होऊ शकतात, यावर विनोदी शैलीत टीकास्त्र सोडले. मंडळाचे सहसचिव वसंत उगले यांनी ‘जनतेचे आरोग्याकडे दुर्लक्ष’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सचिव गोविंदराव बुधे, प्रास्ताविक अध्यक्ष लीलाधर बेंद्रे, तर आभार वासुदेवराव मुरकुटे यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा