ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. शेती-सहकार, राजकारण, ग्रामीण अर्थकारण याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करताना त्यांनी राज्यात या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या बहुआयामी नेतृत्वाने नगर जिल्ह्य़ाला प्रगतीच्या दिशेने नेण्यात महत्वाची कामगिरी बजावल्याच्या भावना या सर्वानी व्यक्त केल्या. 
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण- ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांच्या निधनाने नगर जिल्ह्य़ात सहकार व शैक्षणिक चळवळीचा पाया मजबूत करणाऱ्या नेतृत्वाला आपण मुकलो आहोत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी या कार्याला वाहून घेत कर्मवीरांचाच वारसा पुढे चालवला. सहकाराच्या बलस्थानांचा चांगला अभ्यास करून सहकार चळवळीला त्यांनी नगर जिल्ह्य़ात एका उंचीवर नेऊन ठेवले. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना आधार दिला. कोपरगाव लोकसभा मतदारसंघ व पारनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना शंकरराव काळे यांनी कायम सर्वसामान्य जनतेचा विचार करून या भागाचा विकास साधला. शिक्षण व सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांनी या दोन्ही विभागात राज्याला दिशा देण्याचे काम केले.
विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे- नगर जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांच्या निधनामुळे सहकार व शिक्षण क्षेत्रातील एका अभ्यासू कर्तबगार व्यक्तीमत्वास आपण मुकलो आहोत. सहकार व शिक्षण खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्द उल्लेखनीय ठरली. डेक्कन शुगर इन्स्टिटय़ूट (पुणे), तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरिज (नवी दिल्ली) या संस्थांवर ते प्रदीर्घकाळ संचालक होते. सहकारी साखर उद्योगाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
पालकमंत्री बबनराव पाचपुते- अजातशत्रू असलेले शंकरराव काळे अखेरपर्यंत कर्मयोगी राहिले. गेली सहा-सात दशके काम करताना त्यांनी जिल्हा उत्तम घडवला. सहकार व जलशिक्षणात त्यांचे योगदान मोठे आहे. मुळा व कुकडी धरण तसेच सहकार टिकवून तो वाढवण्यात, रयत शिक्षण संस्थेचे कार्य मोठे करण्यात योगदान आहे. जुन्या पिढीतील एक वेगळ्या प्रकारचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्य़ाचे मोठे नुकसान झाले आहे.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे- शिक्षण व सहकारातील अभ्यासू नेत्याला जिल्हा मुकला आहे. शंकरराव काळे यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून केवळ कोपरगाव तालुकाच नव्हे तर शेजारच्या नाशिक व औरंगाबाद जिल्ह्य़ांमध्येही ऊस पिक वाढीसाठी अथक प्रयत्न केले. या माध्यमातून परिसराच्या विकासाला नवी चालना दिली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात- ज्येष्ठ नेते शंकररावजी काळे साहेबांचे जीवनकार्य संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक ठरले आहे. राजकारण, समाजकारण, शेती, शिक्षण विशेषत: सहकारातील त्यांचे योगदान चिरकाल स्मरणात राहणारे आहे. जिल्ह्याच्या विकासात त्यांनी सातत्याने मोलाचे काम केले. सर्वच क्षेत्रांतील एक मार्गदर्शक त्यांच्या निधनाने हरपला आहे.
माजी मंत्री बी. जे. खताळ- विद्यार्थीदशेपासून आमचा परिचय होता. पुण्याला शिकायला असताना आम्ही एकाच वसतिगृहात राहात होतो. ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. खरे तर शेती, नोकरी यात त्यांना अधिक रस होता. नंतर साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारात, जिल्हा परिषदेत त्यांनी लक्ष घातले. गरिबांच्या शिक्षणाविषयी देखील त्यांना तळमळ होती. त्यांच्या निधनामुळे समवयस्क मित्र गेल्याचे दु:ख झाले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे- शंकरराव काळे यांच्या निधनाने जिल्ह्याच्या नव्हे तर राज्यातील सहकार व शैक्षणिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. यशवंतराव चव्हाणांनी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मला उपाध्यक्ष केले. एकत्रितपणे काम केल्याने जिल्ह्यात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले होते. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही मोठे काम केले. कोळपेवाडी कारखान्यावर त्यांचे अतोनात प्रेम होते. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा प्रभाव होता. स्थानिक राजकीय संघर्षांत त्यांनी नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले. आमचे राजकीय मतभेद होते. परंतु ते मैत्रीआड कधीही आले नाहीत. मैत्रीचा धर्म आम्ही दोघांनीही पाळला.
माजी खासदार गोविंदराव आदिक- माजी खासदार शंकरराव काळे हे जिल्ह्यातील अतिशय दरदृष्टी असलेले नेते होते. सर्वाना सामावून विकासाच्या दिशेने पुढे जाणाऱ्या नेतृत्वाने पूर्ण हयातभर गुणवत्ता व कर्तृत्वावर राजकारणाला नवा आयाम दिला. एवढेच नव्हेतर शेवटपर्यंत अनेक कार्यकर्त्यांना जवळ घेऊन प्रशिक्षित करून काम करण्याची संधी दिली. नव्या पिढीचे नेतृत्व नगर जिल्ह्यात निर्माण केले. आज जी कर्तबगार पिढी जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणात दिसते आहे, ती तयार करण्यात काळे साहेबांचे योगदान आहे. त्यांनी विकासाचे राजकारण केले. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा त्यांना नेहमी आशीर्वाद राहिला. त्यांच्या विश्वासाला ते तसूभरही कमी पडले नाहीत.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख- शंकरराव काळे यांच्या निधनाने जिल्ह्य़ातील कर्तृत्वान पिढीतील दुवा निखळळा आहे. जिल्ह्य़ाच्या राजकारणात त्यांचे मोठे शक्तीस्थान होते. जिल्हा परिषदेचा पहिला अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्य़ाच्या विकासाची घडी बसवली. जिल्ह्य़ाला प्रगतीपथावर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पुढच्या पिढीतील अनेक कार्यकर्त्यांचे गुण हेरून त्यांनी नेते घडवले. नव्या पिढीने आदर्श घ्यावा असेच हे नेतृत्व होते.
अ‍ॅड. रावसाहेब िशदे (कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था) – कर्मवीर भाऊराव पाटलांनंतर आम जनतेला बरोबर घेऊन संस्थेचे सर्वात मोठे काम काळे यांनी केले. मोठय़ा प्रमाणावर शाखा उभारल्या, वाशी येथील महाविद्यालय हे त्याचे ठळक उदाहरण आहे. वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, हे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. संस्थेवर त्यांची पतीव्रतेसारखी निष्ठा होती. १५ वर्षे तन-मन-धनाने काम करणारे ते एकमेव अध्यक्ष होते. राजकीय, सामाजिक अशा सर्व क्षेत्रांतील शक्ती त्यांनी संस्थेसाठी पणाला लावली.
खासदार दिलीप गांधी- सहकार, शिक्षण, बँक अशा सर्व क्षेत्रांत काम केलेल्या व त्याची अत्यंत बारकाईने माहिती असलेल्या ज्येष्ठ नेत्यास जिल्हा मुकला आहे. सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्यांमधील ते एक होते. महिनाभरापूर्वी कोपरगाव येथे भेट झाली असताना त्यांनी मला खासदार म्हणून तुम्ही काय करता असा थेट प्रश्न केला. जिल्ह्य़ाचे विविध प्रश्न, त्यावरचे उपाय, दिल्लीत सुरू असलेल्या त्यासंबंधीचे काम याची मी त्यांना विस्ताराने माहिती दिली.
आमदार डॉ. सुधीर तांबे- शिक्षणातून समाजाचा विकास करण्याचे काम काळे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य अजोड आहे. आधुनिक विचारांची जाण असलेल्या नेत्याच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला.
आमदार विजय औटी- १९७२ ते १९८० या काळात तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शंकरराव काळे यांनी तालुक्यात अनेक पाझर तलावांना मंजुरी मिळवून ते पूर्ण करण्याचे मोठे काम केले. काळू मध्यम प्रकल्पासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यास मंजुरी मिळू शकली नाही मात्र ते पुन्हा याच भागाचे खासदार झाले त्यावेळी त्यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांच्याकडून या खात्याची त्यास मंजुरी त्यांनी मिळवली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे- नगर जिल्ह्याच्या राजकारण व सहकार क्षेत्रात शंकरराव काळे यांनी मोलाचे योगदान दिले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे उघडी केली. कृतीशील धोरणातून संस्थेच्या उभारणीत व वाटचालीत आयुष्यभर योगदान दिले. जिल्हा म्हणून त्यांनी काम केले. राजकारणाच्या पलिकडे काम करणारा तत्त्वाधिष्ठीत असे त्यांचे नेतृत्व होते. काँग्रेस कार्यकर्त्यांचा ते आधार होते.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार- शंकरराव काळे यांच्या निधनाने जिल्हा एका अत्यंत अनुभवी नेत्यास मुकला. सहकाराबरोबरच शिक्षण, कृषी क्षेत्रात त्यांनी मोठे काम उभे केले. जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार म्हणून काम करताना त्यांनी निर्माण केलेल्या विधायक कामांच्या परंपरेतून त्यांचे आदर्श नेतृत्व निर्माण झाले होते, त्यांना राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसची श्रद्धांजली.
माजी आमदार भानुदास मुरकुटे- सहकार क्षेत्रात सामाजिक चळवळीत माजी मंत्री शंकरराव काळे यांनी शेतकरी हितासाठी आयुष्यभर काम केले. समाजहितासाठी झगडणाऱ्या या नेत्याला पोरके झाल्याचे दु:ख आहे.
ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे- वृद्धेश्वर कारखान्याचे विस्तारीकरण काळे यांच्या मदतीमुळेच शक्य झाले. ते खासदार असताना तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांच्याशी त्यांनी माझी भेट घडवून आणली होती. त्यांच्या निधनाने व्यक्तीश: माझी व पाथर्डी तालुक्याची मोठी हानी झाली आहे.
ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे- ग्रामीण भागातील समस्यांची मोठी जाण असलेले ते नेते होते. जि. प. अध्यक्ष व मंत्रिपदाच्या काळात त्यांनी आपल्या कार्याचा मोठा ठसा उमटविला. त्यांच्या जाण्याने जिल्ह्य़ाची मोठी हानी झाली आहे.
अ‍ॅड. विजय बनकर (माजी जि. प. सदस्य)- कार्यकर्त्यांवर, मित्रावर प्रेम करणारा नेता हरपला.

Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते
maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की