राज्यभरातील जिल्हा रुग्णालयांमध्ये असलेल्या अपंग कक्षांमधील सर्व्हर गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त झाल्यामुळे अपंगांना प्रमाणपत्र देण्याचे काम मात्र रखडले जात आहे. कोणाचे छायाचित्र, तर कोणाचे नाव या तक्रारींमुळे कर्मचारीही चांगलेच वैतागले असून, अपंग लाभार्थ्यांची यात गरसोय होत असल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे.
जिल्हा रुग्णालयांतून सर्व अपंग व्यक्तींना अपंग असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले. या प्रमाणपत्रावर संबंधित व्यक्ती नक्की किती टक्के अपंग याची स्पष्ट नोंद केलेली असते. तसेच या अपंगत्वाच्या टक्केवारीवरच लाभार्थ्यांला पुढील मिळणारा लाभ अवलंबून असतो. परंतु सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी रुग्णालयातून बनावट प्रमाणपत्र काढले जात असल्याच्या अनेक तक्रारी राज्यभरातून प्राप्त झाल्या. परिणामी राज्य सरकारने अपंग प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्व जिल्हा रुग्णालयांत अपंग प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले. यात अपंग व्यक्तीची संगणकावर ऑनलाइन माहिती भरली जात असून, अपंग व्यक्तीचे छायाचित्रही संगणकावरच घेतले जात आहे. परिणामी, बनावट प्रमाणपत्राला निश्चितच आळा बसेल, अशी अपेक्षा होती.
परंतु ऑनलाइन प्रमाणपत्र वाटप करणे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी चांगलेच डोकेदुखीचे ठरू लागले आहे. काही दिवसांपूर्वी तर संगणकावर माहिती भरताना एका व्यक्तीच्या प्रमाणपत्रावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव, तर त्यात तिसऱ्याच व्यक्तीचे छायाचित्र दिसू लागल्याचे प्रकार वाढल्याने अपंग प्रमाणपत्र विभागातील कर्मचारी चांगलेच वैतागल्याचे चित्र होते. अपंग लाभार्थ्यांना ऑनलाइन अपंग प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. याबाबत जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधला असता सव्र्हर नादुरुस्त झाल्यामुळे विलंब होत आहे व दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. िहगोली जिल्हा रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षातील सव्र्हर नादुरुस्त झाल्यामुळे अपंगांचे प्रमाणपत्र २० नोव्हेंबपर्यंत मिळणार नसल्याचा फलकच लावला आहे. मागील काही आठवडय़ांपासून अपंग प्रमाणपत्र देण्याचे काम बंदच असल्यामुळे अपंग व्यक्तींना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. आíथक भरुदड व मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा