जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हास्तरीय बदल्यांची प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने ५ ते १५ मेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असताना, आक्षेप व सूचनांचे निराकरण करून अंतिम सेवाज्येष्ठता यादी २ मे रोजी प्रसिद्ध करणे बंधनकारक होते. परंतु अजून सेवाज्येष्ठता सूची तयार नसल्याने बदल्यांचा खोळंबा होणार असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसदर्भात १८ एप्रिलला ठरलेल्या धोरणानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी संवर्गनिहाय वास्तव्य ज्येष्ठता यादी १२ एप्रिलला जिल्हा परिषदेला सादर करणे, १७ एप्रिलला एकत्रित वास्तव्य सेवाज्येष्ठता याद्या तयार करून प्रसिद्ध करणे, १८ ते २७ एप्रिल आक्षेप व सूचना मागवणे, त्याचे निराकरण करून २ मेला सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे बंधनकारक होते. दि. ५ ते १५ मेपर्यंत प्रत्यक्ष बदली प्रक्रिया समुपदेशनाने पार पाडणे, याप्रमाणे अंमलबजावणी होणे बंधनकारक आहे.
बदल्यांच्या प्रकारात प्रशासकीय बदली, विनंती बदली याबाबतचे काही निकष व टक्केवारी ठरली आहे. परंतु ७ मेपर्यंत सेवाज्येष्ठता सूची पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी   तयारच    केली   नाही. त्यामुळे सेवाज्येष्ठता सूची अंतिम प्रक्रियेनंतर   जिल्हा परिषद प्रशासनाकडे कधी जाणारा  यावर प्रश्नचिन्ह आहे.

Story img Loader