बनावट आधार कार्ड आणि दारिद्रय़रेषेखालील नागरिकांसाठी असणारे रेशन कार्ड तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील सादिक हकिमखाँ पठाण (३८) यास मनमाड न्यायालयाने सक्तमजुरी व दंड ठोठावला आहे.
जालन्याच्या अंबड तालुक्यातील भार्डी येथील पठाण याने  सरकारी कर्मचारी असून आधार कार्ड,पिवळे रेशन कार्ड तयार करून देत असल्याचे सांगत  प्रमोद गांगुर्डे यांच्याकडून ५०० रुपये  घेतले.त्यानंतर त्यांना चार आधार कार्डे दिली. पण त्यावर स्वाक्षरी आणि शिक्का नसल्याने ते बनावट असल्याचे लक्षात आल्यावर गांगुर्डे यांनी  मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी मनमाडचे न्यायाधीश कुणाल नहार यांनी संशयित सादिक हकिमखाँ पठाण यास एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा