महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे १ फेब्रुवारी रोजी होणारे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अधिवेशन ३ फेब्रुवारी रोजी पन्हाळा येथील पन्हाळा क्लब मैदान येथे होणार आहे.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकरराव पिचड व उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे काही मंत्री तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस अनिल साळोखे यांनी दिली आहे.
या अधिवेशनास गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे, कामगारमंत्री हसन मुश्रीफ़, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील, महिला सेल राष्ट्रीय अध्यक्षा निवेदिता माने यांच्यासह सोलापूर, सांगली, सातारा, पुणे येथील पक्षाचे खासदार, आमदार, महाराष्ट्र राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा, शहर, तालुका अध्यक्ष असे २५०० प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनासाठी निमंत्रित पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांंनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्धिपत्रकाद्वारे साळोखे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे १ फेब्रुवारी रोजी अधिवेशन
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे १ फेब्रुवारी रोजी होणारे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अधिवेशन ३ फेब्रुवारी रोजी पन्हाळा येथील पन्हाळा क्लब मैदान येथे होणार आहे.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकरराव पिचड व उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे काही मंत्री तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस अनिल साळोखे यांनी दिली आहे.
First published on: 25-01-2013 at 08:08 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Session of rashtrawadi congress party on 1st february in panhala