पोलीस अधीक्षक विठ्ठल जाधव यांच्या अधिपत्याखालील यंत्रणा ‘पोलीस मित्र’ जमवण्यात मश्गूल असताना शहरात चोऱ्यांचे प्रमाण सुरूच असून, सोमवारी मध्यरात्री फरांदेनगर परिसरातल्या एका निवासस्थानातून चोरटय़ांनी ७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.खासगी शिकवणी घेणारे शिक्षक गणेश कुलकर्णी हे फरांदे नगर परिसरात राहतात. कुलकर्णी हे रविवारी खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराला कुलूप होते. मात्र, ही संधी साधून चोरटय़ांनी मध्यरात्री त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील अलमारीचे कुलूप तोडून चोरटय़ांनी सुमारे ७ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. मंगळवारी सकाळी घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, सहायक पोलीस अधीक्षक निर्मलादेवी यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नांदेड पोलीस दलातल्या श्वानपथकालाही पाचारण केले होते. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा