आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असताना दुबार, स्थलांतरित व मयत मतदारांच्या नावांच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शहरातील चिंचवड, िपपरी व भोसरी या तीनही मतदारसंघात मिळून ७० हजार दुबार मतदार आहेत. दोनपेकी एक नाव कमी करण्यासाठी डिसेंबरमध्ये सुनावणी होणार असून आहे. त्यानुसार, ३२० मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून दुबार नावे असलेल्या मतदारांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.
िपपरी मतदारसंघात तीन लाख ६० हजार मतदार असून त्यात २० हजार दुबार आढळले आहेत. हेच प्रमाण भोसरी मतदारसंघात २८ हजार व चिंचवड मतदारसंघात १९ हजार इतके आहे. दुबार मतदारांसाठी ‘बी.एल.ओ’ नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यामार्फत संबंधित नागरिकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्यात या संदर्भात सुनावणी होणार असून िपपरी मतदारसंघातील दुबार मतदारांची सुनावणी १ ते ७ डिसेंबर दरम्यान िपपरीतील कामगार भवनात होणार आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या नागरिकांनी समक्ष उपस्थित राहणे गरजेचे आहे. दोनपैकी कोणते नाव कायम ठेवून कोणते वगळायचे, हे त्यांनी लेखी स्वरूपात द्यायचे आहे. त्यानुसार, पुढील कार्यवाही केली जाणार आहे. पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्यांचे  कोणतेही एक नाव वगळण्याची कारवाई पालिकेकडून केली जाणार आहे. मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असणे कायदेशीर गुन्हा असून तसे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा पालिकेने दिला आहे. शहरी भागात मोठय़ा संख्येने दुबार मतदार आढळून आले आहेत. महापालिका निवडणुकीत उत्साही मंडळी भरमसाठ नावे नोंदवून घेतात. तीच नावे पुढे कायम राहतात. त्यातून दुबार नावांची समस्या
तयार होते, असे अधिकारी
सांगतात.
पाच जानेवारीला अंतिम यादी प्रसिध्द होणार असून त्यादृष्टीने पालिकेचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. यादीत आपले नाव आहे की नाही, हे मतदारांनी तपासून पाहावे. नाव नसल्यास त्याचा दोष यंत्रणेला देता येणार नाही, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. मोठय़ा प्रमाणात असलेल्या स्थलांतरित मतदारांनी स्वत:हून अर्ज करावेत त्याचप्रमाणे मयत व्यक्तींची नावे संबंधित कुटुंबीयांनी महापालिकेला कळवणे आवश्यक आहे. मतदार यादी अद्ययावत व निर्दोष करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे  आवाहन पालिकेने केले आहे.     

Story img Loader