वाशी, तुर्भे परिसरात दोन विविध घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका गुन्ह्य़ात अत्याचार करणारा आरोपी हा अल्पवयीन आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात बलात्कार आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फॉम सेक्शुयल ऑफिन्सेस अ‍ॅक्ट २०१२ र्अतगत गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली आहे. तुर्भे नाका येथील आंबेडकर नगरमधील साय नावाच्या भंगार विक्रेत्याच्या दुकानात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास एक ५ वर्षांची मुलगी रिकाम्या बाटल्या विकण्यासाठी गेली होती. यावेळी दुकानात असलेल्या १७ वर्षांच्या मुलाने पैसे देण्याच्या बहाण्याने दुकानाच्या मागील जागेत नेले. त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार तिने घरी आल्यावर पालकांना सांगितला. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप याने दिली आहे. दुसऱ्या घटनेत तुर्भे परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय रसविक्रेत्याने तब्बल चार महिने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. रहेमान शाकीर खान असे या आरोपीचे नाव आहे. त्याने एका १३ वर्षीय मुलीला पैसे देण्याच्या बहाण्याने नोव्हेंबर २०१३ मध्ये वाशी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पॉवर हाऊसजवळील झुडपात घेऊन जात अत्याचार केला होता. यानंतर वारंवार पैशांचे आमिष देत तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले.
या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा