अल्पवयीन मुलीवर तिच्या जवळच्याच नातेवाइकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर शिवारात घडली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
भारत दादा गव्हाणे (वय २२, रा.अंजनापूर, ता. कोपरगाव) असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीस तुला आंबे देतो असे आमिष दाखवून, तिला शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा आरोपी या मुलीचा अत्यंत जवळचा नातेवाईक आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी आरोपी भारत गव्हाणे याच्या विरुद्ध बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार तसेच बलात्कार या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, घटनेनंतर आरोपी फरार असून शिर्डी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने संतापाचे वातावरण आहे.
नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर तिच्या जवळच्याच नातेवाइकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर शिवारात घडली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
First published on: 04-05-2013 at 01:25 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual violence on underage girl from relative