लातूर शहरात उभारण्यात येणारा शादीखाना राज्यात मॉडेल व लातूरच्या वैभवात भर टाकणारा असेल, असे आश्वासन आमदार अमित देशमुख यांनी दिले. गंजगोलाईच्या मदरसा मीसबाहुल उलूम येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. नगरपालिका स्थायी समिती सभापती अॅड. समद पटेल, उपमहापौर सुरेश पवार, नरेंद्र अग्रवाल, असगर पटेल, मोईज शेख, चाँदपाशा घावटी, अख्तर शेख, अहेमदखान पठाण आदी उपस्थित होते. आमदार देशमुख म्हणाले की, शहरात शादीखाना निर्माण करण्याचे आश्वासन लोकनेते विलासराव देशमुख व आमदार दिलीपराव देशमुख यांनी दिले. त्याची पूर्तता केली जाईल. शादीखान्याची वास्तू देखणी करण्याचा आपला प्रयत्न राहील. मौलाना अली मोहियोद्दीन, अॅड. हमीद बागवान आदींनी विविध सूचना केल्या.
आणखी वाचा