छत्तीसगडमधील दन्तेवाडा जिल्ह्य़ात नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेला उडतरे (ता. वाई) येथील जवान राजेंद्र कुंभार (वय ३५) यांच्यावर सोमवारी सायंकाळी आठ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी (दि. ४) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दन्तेवाडा जिल्ह्य़ातील बाचेली भागातील राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संकुलात कोळसा खाणीवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात राजेंद्र कुंभार यांच्यासह पश्चिम बंगालमधील एक जवान हुतात्मा झाला. १२ वर्षांपूर्वी तो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती झाला होता. सुरुवातीला मध्य प्रदेशात नऊ वर्षे त्यानंतर तीन वर्षे मुंबई येथे सेवा बजावून सात महिन्यांपूर्वी त्यांची तुकडी कोळसा खाणींच्या रक्षणासाठी पाठविण्यात आली होती. वाई तालुक्यातील उडतरे या आपल्या गावी आल्यानंतर सहकारी मित्रांना आपल्या सेवेतील अनुभव तो सांगत असे. नुकताच गणेशोत्सवात तो गावी आला होता. ‘आमचे काही खरे नाही. आम्ही पुन्हा परत येऊ की नाही हे सांगता येत नाही. आम्हाला नक्षलवाद्यांपासून फारच सावध राहावे लागते’ असे त्याने सांगितले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक वर्षांची मुलगी, मोठा भाऊ, आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
दन्तेवाडा येथेच मागील दोन वर्षांपूर्वी नक्षलवादी हल्ल्यात वाई तालुक्यातील धोम येथील चंद्रशेखर देशमुख हा जवान हुतात्मा झाला होता. त्यानंतर तेथेच राजेंद्र कुंभार हा दुसरा जवान हुतात्मा झाला. उडतरे या गावाला ही सैन्य परंपरा आहे. कारगिल युद्धात ७ फेब्रुवारी २००३ रोजी अशोक सीताराम बाबर हा शहीद झाला होता. त्याचे स्मारक गावात उभारण्यात आले आहे. हुतात्मा जवान राजेंद्र कुंभार याचा ५ नोव्हेंबर हा वाढदिवस त्याच दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. तर सहा तारखेला त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे. या विचित्र योगायोगामुळे उपस्थितात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. रविवारी सायंकाळीच त्याच्या मृत्यूची खबर गावात पोहोचली होती. आज सकाळपासून गावात मोठी गर्दी होती. आजूबाजूच्या गावातून लोक आले होते. आज सायंकाळी त्याचा मृतदेह उडतारे या गावी आणण्यात आला. कुटुंबासह मित्र परिवार जोरदार आक्रोश केला. राजेंद्र कुंभार अमर रहे असेही बोलले जात होते. कृष्णा तीरावर शासकीय इतमामात सायंकाळी आठ वाजता अत्यंसंस्कार करण्यात आले. सातारा पोलिसांनी त्याला मानवंदना दिली. या वेळी माजी मंत्री प्रतापराव भोसले, आमदार मकरंद पाटील, नारायण पवार, प्रांताधिकारी सूरज वाघमारे, तहसीलदार सुनील चंदनशिवे आदी उपस्थित होते. पुण्याहून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची बटालियन गौतम कोमर या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आली होती. त्यांनीही राजेंद्र कुंभार या हुतात्मा जवानाला सलामी दिली.

शहीद राजेंद्र कुंभार यांच्यावर अंत्यसंस्कार

India Former Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Live Updates in Marathi
Dr. Manmohan Singh Death LIVE Updates : “देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले”, मनमोहन सिंग यांच्या निधनावर तुषार गांधींची खंत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
Manmohan singh and sharad pawar
Dr. Manmohan Singh Passes Away : “जागतिक धुरंधर नेता गमावला”, शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले

 वाई/वार्ताहर

छत्तीसगडमधील दन्तेवाडा जिल्ह्य़ात नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेला उडतरे (ता. वाई) येथील जवान राजेंद्र कुंभार (वय ३५) यांच्यावर सोमवारी सायंकाळी आठ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविवारी (दि. ) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दन्तेवाडा जिल्ह्य़ातील बाचेली भागातील राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संकुलात कोळसा खाणीवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात राजेंद्र कुंभार यांच्यासह पश्चिम बंगालमधील एक जवान हुतात्मा झाला. १२ वर्षांपूर्वी तो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती झाला होता. सुरुवातीला मध्य प्रदेशात नऊ वर्षे त्यानंतर तीन वर्षे मुंबई येथे सेवा बजावून सात महिन्यांपूर्वी त्यांची तुकडी कोळसा खाणींच्या रक्षणासाठी पाठविण्यात आली होती. वाई तालुक्यातील उडतरे या आपल्या गावी आल्यानंतर सहकारी मित्रांना आपल्या सेवेतील अनुभव तो सांगत असे. नुकताच गणेशोत्सवात तो गावी आला होता. आमचे काही खरे नाही. आम्ही पुन्हा परत येऊ की नाही हे सांगता येत नाही. आम्हाला नक्षलवाद्यांपासून फारच सावध राहावे लागतेअसे त्याने सांगितले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक वर्षांची मुलगी, मोठा भाऊ, आईवडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

दन्तेवाडा येथेच मागील दोन वर्षांपूर्वी नक्षलवादी हल्ल्यात वाई तालुक्यातील धोम येथील चंद्रशेखर देशमुख हा जवान हुतात्मा झाला होता. त्यानंतर तेथेच राजेंद्र कुंभार हा दुसरा जवान हुतात्मा झाला. उडतरे या गावाला ही सैन्य परंपरा आहे. कारगिल युद्धात ७ फेब्रुवारी २००३ रोजी अशोक सीताराम बाबर हा शहीद झाला होता. त्याचे स्मारक गावात उभारण्यात आले आहे. हुतात्मा जवान राजेंद्र कुंभार याचा ५ नोव्हेंबर हा वाढदिवस त्याच दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. तर सहा तारखेला त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे. या विचित्र योगायोगामुळे उपस्थितात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. रविवारी सायंकाळीच त्याच्या मृत्यूची खबर गावात पोहोचली होती. आज सकाळपासून गावात मोठी गर्दी होती. आजूबाजूच्या गावातून लोक आले होते. आज सायंकाळी त्याचा मृतदेह उडतारे या गावी आणण्यात आला. कुटुंबासह मित्र परिवार जोरदार आक्रोश केला. राजेंद्र कुंभार अमर रहे असेही बोलले जात होते. कृष्णा तीरावर शासकीय इतमामात सायंकाळी आठ वाजता अत्यंसंस्कार करण्यात आले. सातारा पोलिसांनी त्याला मानवंदना दिली. या वेळी माजी मंत्री प्रतापराव भोसले, आमदार मकरंद पाटील, नारायण पवार, प्रांताधिकारी सूरज वाघमारे, तहसीलदार सुनील चंदनशिवे आदी उपस्थित होते. पुण्याहून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची बटालियन गौतम कोमर या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आली होती. त्यांनीही राजेंद्र कुंभार या हुतात्मा जवानाला सलामी दिली.

Story img Loader