‘कृषी औद्योगिक समाजरचना व व्यवस्थापन प्रशासन’ क्षेत्रातील कामगिरीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या  पारितोषिकासाठी ज्येष्ठ कृषितज्ज्ञ आणि शेतकरी नेते शरद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम २ लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.शरद जोशी यांनी गेली अनेक वर्षे शेतीचे अर्थकारण आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी संघर्ष केला आहे. शेती उत्पादनात भर घालून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, अशा आधुनिक व वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन जोशी यांना या पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच २५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉइंट, येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जोशी यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

Story img Loader