सुप्रसिद्ध यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या सांगता समारोहास अखेर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची उपस्थिती राहणार आहेत. उद्या, २७ जानेवारीला यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्र म होणार आहे.
यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी संस्थेची स्थापना  तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याच प्रेरणेने झाली होती.  पवारांचा या भागा दौरा निश्चित झाल्यानंतर त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मान्य केले. त्यानंतर  संस्थाध्यक्ष आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करून कार्यक्रमाची माहिती दिली.
यशवंत महाविद्यालयात संस्था संचालकांसह या कार्यक्रमाची माहिती देताना देशमुख म्हणाले की, यशवंतच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्य विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा सांगता सोहळा २७ जानेवारीला दुपारी ३ वाजता यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. प्रमुख पाहुणे कृषीमंत्री शरद पवार राहणार आहेत, तर विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, अन्न व औषधी प्रशासनमंत्री मनोहर नाईक, नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख व राज्यमंत्री सचिन अहिर उपस्थिती राहणार आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राऊत म्हणाले की, सुवर्ण महोत्सवी वर्षांत विविध कार्यक्रम संस्थेने आयोजित केले होते. मराठी साहित्यलेखन कार्यशाळा, संगीत कार्यशाळा, संविधान जागृती परिषद, विद्यार्थिनीसाठी ‘कळी उमलतांना’ हा कार्यक्रम व विदर्भ साहित्य संघाचे हीरक महोत्सवी संमेलन व मराठी प्राध्यापक परिषदेचे अधिवेशन घेण्यात आले होते. प्रामुख्याने ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून संस्थापक बापुरावजी देशमुख यांनी संस्थेची स्थापना केली होती. त्यामुळेच ग्रामीण भागात २२ माध्यमिक शाळा व ११ कनिष्ठ महाविद्यालये असून चार वरिष्ठ महाविद्यालये व एक अभियांत्रिकी महाविद्यालय संचालित केले जाते. अशी माहिती देण्यात आली.
याप्रसंगी संचालक शशांक घोडमारे, डॉ. किशोर अहेर, राकांॅचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, समीर देशमुख यांची उपस्थिती होती.
सांगता सोहळा आगळावेगळा करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार असल्याचे या सर्वानी आवर्जून नमूद केले.

Story img Loader