कराड  परिसरासह नित्याची वर्दळ असलेल्या उपनगराच्या ठिकाणी शेअर-ए-रिक्षा सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, रिक्षाचा मार्ग व प्रतिप्रवाशी भाडे निश्चित करण्यात आले आहे. शहर व उपनगरात नवीन १७ अ‍ॅटोरिक्षा थांब्यांना व २७ ठिकाणी शेअर-ए-रिक्षा सेवा सरू करण्यास जिल्हा परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली असल्याची माहिती कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी दिली.
कराड शहर व उपनगरात नवीन मंजूर झालेले अ‍ॅटोरिक्षा थांबे व त्या थांब्यावरील रिक्षांची संख्या पुढीलप्रमाणे- कोयना वसाहत ५, गणेश कॉलनी १०, आझाद कॉलनी आगाशिवनगर ५, दांगटवस्ती आगाशिवनगर १०, मुंढे गाव १०, गोटे स्टॉप १०, पाटण तिकाटणे (वारुंजी फाटा) १०, दैत्यनिवारिणी १०, चैतन्य हॉस्पिटल ५, बनपुरी रस्ता मार्केट यार्ड ५, मिलिटरी कॅन्टीन मार्केट यार्ड १०, मुजावर कॉलनी १०, सह्याद्री मंगल कार्यालय, शिक्षक कॉलनी ५, कृष्णा पॅलेस हॉटेल ५, एसजीएम कॉलेज विद्यानगर ५, रुक्मिणी पार्क ५, पाण्याची टाकी रविवार पेठ  ५.
कराड शहर परिसरामध्ये मोक्याच्या ठिकाणी शेअर-ए-रिक्षा सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, कराड एसटी आगारापासून शेअर-ए-रिक्षा सुटत असतात. त्यांचे मार्ग व प्रतिप्रवाशी भाडे रुपयांमध्ये पुढीलप्रमाणे- कराड बस आगार  ते कॅनॉल ८ रुपये, कालेज १३, बनवडी १८, बनवडी कॉलनी २०, एमएसईबी २१, गजानन हौसिंग सोसायटी १३, ओगलेवाडी २२, ओगलेवाडी रेल्वे स्टेशन २२, कार्वेनाका ८, थोरात हॉस्पिटल ११, कार्वे १९, गोळेश्वर २०, कापील २०, कोल्हापूर नाका ६, ढेबेवाडी फाटा ११, मलकापूर फाटा १२, मलकापूर १५, रिलायन्स पेट्रोलपंप १७, गणेश कॉलनी आगाशिवनगर १७, वारुंजी फाटा ११, गोटे १६, मुंढे १९, विमानतळ १६, विजयनगर २५, सैदापूर १९, सैदापूर (जुने गाव) २१ रुपये.

Story img Loader