सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नव्याने सुरू झालेल्या संपर्क कार्यालयाची मोडतोड झाल्याच्या प्रकरणाशी शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष तौफिक शेख यांनी आपला किंवा आपल्या सहकाऱ्यांचा काडीमात्रही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. संपर्क कार्यालयाची मोडतोड करून कोणी तरी अज्ञात समाजकंटकांनी करून त्याचे खापर आपल्या सहकाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा शेख यांनी केला आहे.
शहरातील लष्कर भागात गेल्या शनिवारी रात्री आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. परंतु नंतर अवघ्या दहा मिनिटांतच या संपर्क कार्यालयात तरुणांच्या टोळक्याने घुसून नासधूस केली. पक्षांतर्गत गटबाजी व झुंडशाहीच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु त्याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. संपर्क कार्यालयावर हा हल्ला कोणी केला, त्यास जबाबदार कोण, हे काँग्रेसमध्ये कोणीही सांगावयास पुढे येत नाहीत. किंवा त्याबद्दल पोलिसांत तक्रारही दिली गेली नाही.

Story img Loader